पाहिलंय मी त्या मोगऱ्याच्या कळीला
त्या ओल्या पावसात चिंब भिजताना
त्या पांढऱ्या शुभ्र धुक्यात
अलगत उमलताना
सूर्याची कोवळी किरणे
अंगावर झेलताना
विजेच्या प्रकाशात
आनंदाने चमकताना
पाहिलंय मी तिला, सुगंधाने
सगळ्यांना बेधुंद करताना
त्या अत्तराला आपलं
अस्तिव बहाल करताना
ती कळी असताना च
तिला गजऱ्यात विणताना
स्त्रियांच्या केसात
कोमेजून जाताना...!
- आदिती जाधव.
#मराठी #मराठीसाहित्य #कविता #मोगरा #अत्तर #गजरा #बोल_रातराणीचे