चार ओळींची कविता जेव्हा कोऱ्या कागदावर लिहिली जाते, तेव्हा त्यात फक्त शब्दांची जुळवा जुळव नसते. एका ओळीतल्या चार-पाच शब्दांत हजारो भाव-भावना लपलेल्या असतात. त्या कुणाला तरी कळतात तर काहींना भावतात, कोण तरी अनुभवतं तर कधी-कधी ती कविता निव्वळ वाचून सोडून देतं. काहींना पटतं काहींना नाही पण त्या कोऱ्या कागदाला मात्र अगदी मनापासून आनंद होत असतो. कवितेच्या चार ओळी कोऱ्या कागदाला नवीन ओळख देतात. त्यावर लिहिताना लेखक-लेखिका, कवी-कवयित्री खाडाखोड करून त्याला त्रास देतात ती गोष्ट वेगळी च म्हणा.
एखादी कविता लिहिताना, कवी-कवयित्रींच त्या कवितेशी वेगळंच नातं निर्माण होतं. बऱ्याचदा ती कविता त्यांच्या आयुष्यातला एखादा किस्सा सांगत असते. त्या कवितेतला शब्दांशब्द कवियत्री ची भावना उस्फूर्तपणे व्यक्त करत असतो. पण, तुम्ही कधी विचार केलाय का..., कवितेचं अन् कोऱ्या कागदाचं काय बरं नातं असेल ? आणि कसं असेल ? त्याचं नातं कुणाच्या नजरेस पडलं असेल का, पडलं असेल तर ते कुणाला उमजलं तरी असेल का ? कधी कोणी प्रयत्न तरी केला असेल का, त्यांचं नातं शब्दांत मांडण्याचा..?
'काही नाती शब्दांत मांडता येत नाहीत', हे अगदी खरंय..! तुम्ही ही सहमत असाल.... आहात ना सहमत..? हे ही नातं तसंच आहे. जेव्हा कवी-कवयित्रीं, कोऱ्या कागदावर कविता लिहितात तेव्हा तो कोरा कागद त्या कवितेला आपलंसं करून स्वतःमध्ये सामावून घेतो. मग त्या कागदाला त्या कवितेच्या नावाने ओळखलं जातं तर कधी कधी कवितेला त्या कागदावरून लक्षात ठेवली जाते. कागद आणि पेन नेहमी चं मित्र राहिले आहेत. पण कागद आणि कविता यांचं नातं इतकं अतुट आहे की, जरी हातात मोबाईल आला कविता, लेख त्यात type करून ठेवले तरी डायरीतल्या त्या कागदाशी कवितेचं नातं तुटनं अशक्यचं..!
- आदिती जाधव.
Apratim
उत्तर द्याहटवाब्लॉग मानवजीवनाचा संबंध सांगतोय. छान मांडलयं. रातराणीसाठी तू केलेले प्रयत्न ! कवीला काय सांगायचे आहे, त्याची खोली किती आहे हे इतरांना कधीच समजत नाही. जो-तो आपआपल्या प्रमाणे समजण्याचा प्रयत्न तेव्हडा करतो, अर्थ लावत असतो. बरोबर असेलच असं नाही. कवी नसेल तर त्याला जे बोलायचे असते ते ही अज्ञात ठरते.
उत्तर द्याहटवाब्लॉग मानवजीवनाचा संबंध सांगतोय. छान मांडलयं. रातराणीसाठी तू केलेले प्रयत्न ! कवीला काय सांगायचे आहे, त्याची खोली किती आहे हे इतरांना कधीच समजत नाही. जो-तो आपआपल्या प्रमाणे समजण्याचा प्रयत्न तेव्हडा करतो, अर्थ लावत असतो. बरोबर असेलच असं नाही. कवी नसेल तर त्याला जे बोलायचे असते ते ही अज्ञात ठरते.
उत्तर द्याहटवाKamal yrrr❤️
उत्तर द्याहटवा