सुट्टी सुद्धा कंटाळून निघून जाते. पण ह्या दिवाळीत घरी आरामात बसायला ही थारा नाही आणि आता रांगोळी काढावीशी वाटते, फराळ बनवावासा वाटतोय, येताना जाताना जो तो फटाके फोडतोय तर काल मलाही वाटले फटाके फोडावेसे म्हणून बाबांना फटाके विकत आणायला सांगितले. बाजूच्या घरातली रेवा आणि समोरच्या घरातली सेजल आम्ही सगळे मिळून फुलबाजे पेटवत होतो ते बघून चाळीतली इतर लहान मुलं आली आणि त्यांनी सगळे फुलबाजे पेटवून संपवले. आणि माझा हिरमुस झाला.
बऱ्याचदा विचार करते, हे सगळं सुरु कुठून झालं ? सण साजरे करणं सोडून देणं, मज्जा मस्ती सगळी बाजूला सारणं... मग घर बंद करून 'जे आहे ते ठीकेय' असंचं म्हणून गप्प बसावं लागतं. आता प्रश्न निर्माण होतो तो, पुन्हा सुरुवात करायचा... हिम्मत नाही होतं, इच्छा नाही होतं, खरं तर भीती वाटते. ('कसली ?' हा प्रश्न इथे तसा विचारण्यासारखा नाही.) सण आले की येताना आनंद देखील घेऊन येतात, असं म्हणतात. त्याला बहुतेक आमचं घर परकं वाटत असेल. आज जवळजवळ ३-४ वर्षांनी ह्या गोष्टी खुपू लागल्यात. का ?
नाही उत्तर मिळत, निरुत्तर करतात हे 'सणासुदीचे दिवस' !