शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

मी कविता लिहिणार नाही

त्या ओसरत्या सांज वेळी
स्मरती तुझ्या आठवणी
सारेच नकळत घडूनी गेले
आता कोणास दोष देशील ?

निघून जाण्याआधी मी
सांगू पाहत होते काही
तू थांबून ऐकशील
असे उगाचच स्वप्न पाही

माझ्या प्रश्नांची काही
मज उत्तरं गवसली नाही
तू येऊनि विचारशील 
अशी भोळी आशा मज नाही

जाता जाता तुला एकदा
शेवटचे पाहिले होते
ती खिडकी बंद करताना
क्षणभर श्वास रोखले होते

पुन्हा कधी तुझ्या नजरेस 
माझी नजर मिळणार नाही
ही कविता शेवटची, यानंतर 
तुझ्यासाठी मी कविता लिहिणार नाही.

           - ©आदिती

#मराठी #कविता #तू #सायंकाळ #आठवणी 

1 टिप्पणी:

  1. किती छान लिहलंय. एकेक कविता वाचताना मी रमून गेलो.अंतर्मुख झालो.खुप छान.धन्यवाद! या site वरच्या कविता खुप छान असतातत.प्रतिलिपीवर कविता वाचल्या होत्या.आता blog वरच्या कविता वाचून छान वाटलं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...